माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची मुदत संपत आल्याने संघाचे मार्गदर्शक एम ए माजीद यांचे अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारणीसाठी निवडीची बैठक रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार संघाच्या भवनांमध्ये संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष शहजाद खान यांनी केले. निवड समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार एम ए माजिद, विनोद पाचपिल्ले, अकबर सिद्दीकी, निहाल अहमद, दीपक राजूरकर, प्रभाकर कुरे, एम के कादरी आदी मान्यवरांचा समावेश होता. पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्यात आली असून अध्यक्षपदी शेख शकील अहमद, कार्याध्यक्षपदी बालाजी शिंदे सोसकर, सचिव पदी ज्ञानेश्वर रोकडे पाटील, उपाध्यक्षपदी किसनप्रसाद खाडे,सिराज सिद्दिकी, रियाज चाऊस, संतोष लहाने, एम एजाज, रामप्रसाद कंठाळे,सहसचिव मौलाना सिराजोद्दीन नदवी, कोषाध्यक्ष आबेद देशमुख, सहकोषाध्यक्ष मोबीन, सदस्यपदी एकनाथ अवचार, सय्यद नसीर,इरफान कुरेशी, शेख रफिक तांबोळी,निशाद अहमद आदींची निवड करण्यात आली आहे या कार्यकारिणीच्या निवडीच्या बैठकीला जिंतूर,बोरी, चारठाणा आदी गावातील मराठी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्र संचालन करून आभार विनोद पाचपिले यांनी मानले









