वसंता पोटफोडे
शहर प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव:निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच त्यात तालुक्यातील जिनींग मालक कमी दराने कापुस खरेदी तसेच गाव खेड्यांमध्ये काही जण कापुस खेडा खरेदी करून शेतकऱ्यांना लुटत आहे.त्यामुळे यावर कारवाई करून कापसाला प्रति क्विंटल १२हजार रुपये भाव देण्यात यावा तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना पिक विमा कंपनीने १,२,३अशा चिल्लर रुपयांची भरपाई देवुन शेतकऱ्यांची फसवणूक करून क्रूर थट्टा पिक विमा कंपनीने केली असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येवुन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपुर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाव्दारे मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुका उपाध्यक्ष सुरज लेणगुरे, मनसे ता. अध्यक्ष अरिफ शेख, मनसे शेतकरी ता. अध्यक्ष संदीप कुटे यांनी केली आहे.