करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, अकोला
अकोला : शासनाने अपंगांचा जलदगतीने विकास व पुनर्वसन व्हावे म्हणून शासनाने शासन निर्णय व परिपत्रक निर्गमित केलेले आहे. परंतु शासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपंग हा विकास व पुनर्वसनापासून वंचित राहत आहे. प्रशासनाला जागृत करण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केलीत. तरी सुद्धा कुंभकर्णासारखे झोपी गेलेले प्रशासन जागृत होत नाही. यापुर्वी विभागीय आयुक्त मॅडम यांच्या अध्यक्षतेत विभागीय कार्यालय अमरावती येथे दि. २३/०८/२०२३ रोजी याच मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन केलेले होते व यावर सविस्तर चर्चा करुनही मागण्यांवर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते व संबंधित पाचही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे आदेशीत करण्यात आले होते परंतु या अपंगांच्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने विभागीय आयुक्त यांच्या लेखी आदेशाला सुद्धा जुमानत नाही. अशा प्रशासनाच्या विरोधात अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात दि. २०/१२/२०२३ रोजी 11 वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते विभागीय आयुक्त कार्यालयावर अपंगांकडून प्रशासनाचा धिक्कार असो आंदोलन असून अमरावती विभागातील सर्व अंध अपंग, निराधार यांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अकोला जिल्हाध्यक्ष करामत शाह यांनी या अधिकृत माहिती दिली







