बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी, पुरंदर (सासवड)
पुरंदर- हवेली मतदारसंघातील सासवड ,जेजुरी ,दक्षिण पुणे या शहरी भागात भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे निधी अभावी अनेक दिवस प्रलंबित असून ,या कामासाठी शासनाने निधी भरीव द्यावा. तसेच पुरंदर हवेलीतील विद्युत विभागातील विविध कामासाठी दिलेल्या 178 कोटीच्या निधीत आणखी वाढ करण्याची मागणी, आमदार संजय जगताप यांनी गुरुवारी दि.( 14 )नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली. राज्यात विद्युत विभागाची “एक गाव एक दिवस” ही योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असलेला पुरंदर विधानसभा हा एकमेव तालुका आहे .नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी वीजपुरवठा सुरू करणाऱ्या वाहिनीचे विभाजन करणे, तसेच त्यांची कार्यक्षमता आणि सार्थकता वाढवण्यासाठी शासनाकडून नवीन वीज उपकरण उभारणे, नवीन एलटी लाईन उभारणे ,नवीन रोहित्र बसवणे, सद्यस्थितीतील रोहिताची क्षमता वाढवणे ,नवीन फिडर, नवीन एबीसी तसेच इतर दुरुस्तीच्या कामासाठी 178 कोटी 37 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र यात आणखी वाढ करून पुणे जिल्ह्याच्या एकूण निधीच्या दहा टक्के निधी पुरंदर विभागासाठी द्यावा .संजय जगताप, आमदार पुरंदर. तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सासवड ,जेजुरी आणि दक्षिण पुण्यातील आंबेगाव पासून उडी,पिसोळी, येवलेवाडी, फुरसुगी आदी नवीन शहरीकरण होत असलेल्या भागात भूमिगत विद्युत वाढण्यासाठी शासनाने निधी देण्याची मागणी करीत आमदार संजय जगताप यांनी मतदार संघातील हवेलीतील गावे विद्युत विभागाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या उपविभागांना जोडली गेली आहेत. त्या ऐवजी या सर्व गावांना एकच उपविभागीय कार्यालय केल्यास काम करणे सोपे जाईल असे सांगत या गावासाठी एकच करता येईल का? असा प्रश्न अंगार संजय जगताप यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवेली येथील गावासाठी एकच उपविभा कार्यालय करण्याबाबत या मागणीची व्यवहार आता तपासून शक्य असल्यास करण्याबाबत कळविले आहे.







