प्रकाश नाईक तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा :- महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतील आज दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी यशवंत स्टडीयम नागपूर येथून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्य भरातील पोलीस पाटील २० – २५ हजार पोलीस पाटील उपस्थिती होते. यशवंत स्टडीयम वरून विधानसभा भवनच्या दिशेने निगालेले मोर्चा पुढे झिरो माईला येथे सभेत रूपांतर झाले होते. या मोर्चात पोलीस पाटीलच्या प्रमुख मागणी १८ हजार रुपये मानधन वाढ झाली पाहिजे, पोलीस पाटलाचे नूतनीकरण बंद झालं पाहिजे, निवृत्तीचे वय 65 वर्ष अशा पोलीस पाटलाच्या प्रमुख मागण्या आहेत.या मोर्चात धडगाव तालुक्यातून पोलीस पाटलांनी मोर्चात सहभागी झाले होते. भुजगावचे पोलीस पाटील दिपक पावरा तालुका अध्यक्ष दिलवरसिंग वळवी उपअध्यक्ष आग्रश्या पावरा सचिव दिपक पाडवी व इतर गावाचे २० ते ३० पोलीस पाटलांनी मोर्चात सहभाग झाले होते. या मोर्चात विविध पक्षाचे आमदार सुद्धा उपस्थित होते.