भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: ता.१६ पुणे विभागीय शालेय कॅरम स्पर्धा आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव या ठिकाणी १३ व १४ डिसेंबर २०२३ दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या पुणे विभागीय कॅरम स्पर्धेत विक्रम रमेश राठोड याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.त्याची निवड शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी झाली आहे. या खेळाडूना क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत,विक्रम घुटे,संतोष ढोले यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी खेळाडूंचेआबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.विद्याधरजी काकडे साहेब, जि. प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंहभैया काकडे, विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते,उपप्राचार्या रुपा खेडकर,उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे,सुनील आव्हाड, पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.