मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे: कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,यासह इतर मागणीसाठी राज्य सरकारी-निमसरकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरूवार (ता.१४) पासून बेमुदत संप पुकारलेला आहे.या संपात चांदूर रेल्वे शहरातील सर्व शासकीय,निमशासकीयकार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सामील झाले. त्यामुळे राज्य शासनाचे सर्व कामकाज ठप्प पडले आहे.जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला. या संपामध्ये चांदूर रेल्वे शहरातील तहसील कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय,पंचायत समिती,तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांसह इतर सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सामील झाले. या संपामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील शासकीय कार्यालय ओस पडले होते.तर सर्वसामान्य नागरिकांची कामे अडखडून पडल्यामूळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर हा संप सुरू राहून नागरीका याचा फटका बसणार आहे हे मात्र नक्की