योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर (२३ जुलै)- चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या नवतळा ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची जागा रिक्त असल्यामुळे आज दि 23 जुलै ला सरपंच पदाची निवडणूक घेऊन सरपंच म्हणून कांग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच कुंडलिक हरीचंद्रजी मेश्राम विराजमान झाले. सदर ग्रामपंचायत च्या निवडणुका मागील 5 महिन्यांपूर्वी झाल्या परंतु सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित महिला निघाल्यामुळे या पदासाठी उमेदवार नसल्याने या पदा ला स्थगिती दिली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज तालुका निवडणूक अधिकारी यांनी सरपंच पदाची निवडणूक घेतली असता कांग्रेस पक्षाचे उमेदवार कुंडलिक मेश्राम हे निवडुन आले व सरपंचपदी विराजमान झाले. नवतळा ग्रा प वर कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकविला त्यांच्या या निवडीबद्दल शुभेच्छा देतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वय तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गट नेता डॉ.सतीश वारजूकर, चिमूर पंचायत समिती चे उपसभापती रोषण ढोक,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष विजय डाबरे, प्रकाश मासुरकर अजय जंगीटवार युवक काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख चिमुर विधानसभा शुभम पारखी उपसरपंच तुळशीदास शिवरकर, भाष्कर रामटेके, शामराव तुमराम ग्रामपंचायत सदस्य, भारत ठवडे रमेश गणविर, नामदेव मेश्राम, नामदे पेणदाम, अत्तदीप मेश्राम व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











