पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.23: शहरातील लोकमान्य टिळक उद्यान येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त नगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी चे नेते तथा कन्नड नगर पालिका चे सभागृह नेते संतोष कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपालिकेच्या वतीने टिळक उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येत असून या उद्यानाचे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यावेळी नगर सेवक भानुदास शिंदे यांच्या सह अभय जोशी,प्रमोद धर्मा,साई देशमुख,शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पवार,रमण बापू,कुलकर्णी, भूषण जोशी,दीपक ताठे,अमोल पवार,प्रेमसिंग बेनाडे,प्रशांत देशमुख,शुभम पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते दोपक ताठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.