भाजपा जिल्हा अध्यक्ष श्याम बडे यांच्या पुढाकाराने
अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं. आज 12 डिसेंबर रोजी त्यांची जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं पूर्ण नाव गोपीनाथ पांडुरंग मुंडे होतं. 12 डिसेंबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला.गोपीनाथ मुंडेंनी लोकनेते म्हणून भरतीय राजकारणात आपला ठसा उमटवला.2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.बीड हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता.महाराष्ट्रात भाजपला पुढे नेण्यासाठी मुंडेंना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. त्यांची प्रतिभा पाहून पक्षाच्या वतीने त्यांना दिल्लीला बोलावले. 2009 मध्ये ते लोकसभेचे सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी लोकसभेतून राजकारणाचा डाव पुढे नेला. काही काळानंतर त्यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मुंडे हे महाराष्ट्रातील एक उगवता तारा होते. त्यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे जेथे त्यांनी मेळावे घेतले मुंडे जिथे गेले तिथे गर्दी जमली आणि लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले.आणि आज त्यांच्या जयंती निमित्त मालेगांव तालुक्यातील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजित केले होते. या वेळी मान्यवरांनी ह्या शिबिराला भेट देत तालुक्यातील महिला,पुरुषांनी शेकडोच्या संख्येने प्रतिसाद देत रक्तदान केले. रक्त संकलन वाशिम जिल्हा आरोग्य केंद्राच्या वतीने केले गेले.


