उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी,तळोदा
तळोदा:येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय आवारात पद्मविभूषण शेतकऱ्यांचे कैवारी तसेच देशाचे नेते खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त ५६० महिलांना ब्लॅंकेट वाटप, कार्यालय सुशोभीकरण व केक कापून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. लोभानी ,धनपूर आणि विविध खेड्यापाड्या वरचे शेकडो लोकांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराधारेवर विश्वास ठेवून आणि जिल्हाध्यक्ष उदयसिंग दादा पाडवी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. दादांनी सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांना जोमाने पक्ष संघटन वाढवण्याचे आवाहन केले तसेच जिल्हा बूथ प्रमुख केसर सिंग क्षत्रिय ,ख.वि. संघ व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम चव्हाण, हाजी याकूब पिंजारी , शशिकांत नगराळे आणि तालुकाध्यक्ष संदीप परदेशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले, या वेळी उदयसिंग पाडवी यांनी पवार साहेबांच्या संसदीय कार्यकाळात झालेले महिला आरक्षण आणि शेतकऱ्यां विषयी माहिती देतांना जो शेतकरी आजच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यकाळात त्रास भोगत आहे, आपल्या मालाला भाव भेटत नाहीये म्हणून शेतकरी त्रस्त आहे. अशा सरकारला आपला पक्ष आणि आपले संघटित लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात आपणास लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत नगरपरिषद निवडणुका लढवायच्या आहेत, आणि साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार माजी आमदार उदेसिंग पाडवी,विधानसभा बुथबांधणी अभियान जिल्हाध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय,जिल्हाउपाध्यक्ष रामराव आघाडे,याकूब पिंजारी , रकीफ रफियोद्दीन, खरेदी विक्री उपसभापती पुरुषोत्तम चव्हाण,प्रल्हाद आप्पा मराठे,तालुकाध्यक्ष संदीप परदेशी,शहराध्यक्ष योगेश मराठे,उपसभापती कृ. उ.बा.स.तळोदा हितेंद्र क्षत्रिय,माजीभनगरसेवक गणेश पाडवी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष आरिफ शेख, शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, खरेदी विक्री संचालक चंदू भोई, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला विभागीय अध्यक्ष अनिता परदेशी, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंजुळाताई पाडवी महिला शहर अध्यक्ष ज्योतीताई गुरव, माजी नगरसेवक भास्कर मराठे ,अतुल सूर्यवंशी,महेंद्र गाढे,राहुल पाडवी,पिंटू गाढे,संदीप वळवी,अनिल पवार,भटया पाडवी,सरपंच दीपक वळवी, योगेश वळवी, विकास क्षत्रिय, इमरान सिकलीकर, नितीन मराठे मिस्त्री, आदित्य रामराजे, साबीर मिस्त्री, मुश्ताक अली, फराज पठान, कालुमिया,नासिर शेख, सोहेब पठाण, शाहरुख कुरेशी आदी सह नागरिक उपस्थित होते…