रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील प्राचीन भवानी माता मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यात आला असून त्यानिमित्त सुरू असलेल्या देवी भागवत सोहळ्यात दररोज दोन्ही वेळ हजारो भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत असल्याने संपूर्ण शहराचे वातावरण भक्तीमय झाले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सवाच्या महापर्वावर हिवरखेड येथील श्री भवानी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत संपन्न होत आहे या सप्ताह कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचे किर्तने होत आहेत. यामध्ये तिर्थ स्थापना दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी हभप आत्माराम महाराज वाकोडे यांंचे हस्ते झाली. विशेष मार्गदर्शक हभप रमेश महाराज अवारे होते. देवी भागवत दिनांक 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत हभप राजेन्द्र महाराज वक्टे यांचे अमृत वाणीतून सुरु असून दि. 13 डिसेंबर व 14 डिसेंबर ला होम हवन चा कार्यक्रम राहिल. 5 डिसेंबर रोजी हभप रमेश महाराज अवारे, 6 डिसेंबर हभप रामभाऊ महाराज उन्हाळे 7 डिसेंबर रोजी हभप शिवेंद्र महाराज काळे, 8 डिसेंबर रोजी हभप रामकृष्ण महाराज अंबुसकर 9 डिसेंबर रोजी हभप शिवाणी महाराज झामरे 10 डिसेंबर रोजी हभप जगदीश महाराज पाटील इत्यादी मान्यवरांची कीर्तने झाली असून 11 डिसेंबर रोजी हभप राहुल महाराज कडु दिनांक. 12 डिसेंबर रोजी हभप श्रीधर महाराज अवारे याचे काल्याचे किर्तन होणार आहे गायनाचार्य श्रीकृष्ण महाराज रावनकार, हभप सोपान महाराज लोखंडे, श्रीकांत महाराज कुकडे, हभप रामदास महाराज शेळके काम पाहणार आहेत मृदूंगाचार्य म्हणून हभप हरिदास महाराज भोयर काम पाहणार आहेत. विठ्ठल मंदिर, भवानी मंदिर, शंकर संस्थान दुर्गा माता मंदिर व समस्त गावकरी मंडळी हिवरखेड यांचा सहभाग आहे. दैनंदिन कार्यक्रम मध्ये काकडा आरती देवी भागवत हरिपाठ किर्तन सुरु आहे. नगर प्रदक्षिना व भव्य दिडी सोहळा दिनांक 11 डिसेंबर रोजी 3 वाजता राहील. दिनांक 15 डिसेंबर शुक्रवार ला देवी ची प्राणप्रतिष्ठा व कळस रोहन सोहळा श्री महंत कृष्णानंदजी भारती महाराज वारी हनुमान यांच्या हस्ते संपन्न होणार आहे त्यानंतर भव्य महाप्रसादानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे भावीक भक्तानी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन भवानी माता मंदीर संस्थान व गावकरी मंडळी हिवरखेड रूपराव च्या वतीने करण्यात आले आहे.