व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधि अहेरी
अहेरी मुलचेरा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नुकतेच मूलचेरा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्री पदाची शपथ घेताच विकास कामांचा धडाका लावला आहे.जिल्ह्यात विविध तालुक्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणताना दिसत आहेत.जिल्ह्यात विकास कामांसोबतच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौजफाटा उभी केली आहे. मुलचेरा तालुक्यात सुरू असलेले विकास कामे, कुशल नेतृत्व आणि काही मंत्रालय स्तरावरील कामांसाठी ना.धर्मराव बाबा आत्राम यांचा सुरू असलेला पाठपुरावा या विविध कारणांनी तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होतांना दिसत आहेत.नुकतेच लगाम येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात गीताली आणि कांचनपूर येथील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाच्या दुपट्टा गळ्यात टाकून सर्वांचा पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,जेष्ठ कार्यकर्तेश्रीकांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधरभरडकर,श्रीनिवास गोडशेलवार,अमित मुजुमदार,सरपंच दीपक मडावी,उपसरपंच दिवाकर उराडे, माजी प.स.सभापती नामदेव कुसनाके,शैलेंद्र खराती,सुशील खराती,जोगदास कुसनाके,महादेव सिडाम,रीना मुजुमदार,उमा आत्राम, वेदिका गनलावार,राजू पम्बालवार आदी उपस्थित होते.


