निशांत सोनटक्के
शहर प्रतिनधी
पांढरकवडा
पांढरकवडा : – स्थानिक गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्यास व स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर शाळेचे प्राचार्य स्वप्निल कुलकर्णी, उपप्राचार्य अमित काळे , सहाय्यक शिक्षक दिपक मिश्रा व नाझिया मिर्झा मॅडम उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणातून व कवितेच्या माध्यमातून प्राचार्य स्वप्नील कुळकर्णी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाला लाभलेला कोहिनुर हिरा होय.बाबासाहेबांचे विचार परिसाप्रमाणे आहेत. ज्यांनी त्यांचे विचार अंगीकारले त्यांच्या जीवनाचे सोने झाले. बाबासाहेब जरी शरीररूपाने आपल्या सोबत नसले तरी त्यांचे विचार नेहमी सोबत आहेत.ते विचाररूपाने अमर आहेत. असे प्रतिपादन केले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.यावेळी शाळेतील संगीत शिक्षक रवींद्र शेंडे व विद्यार्थी लक्ष्मी चिंतावार, गितिका बोगावत, नचिकेत मायी, आराध्य राऊत, मंथन गोहोकार व वर्ग ३ री च्या व ८वी च्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गाणे व नाटिका सादर केली. यामध्ये स्वरा हामंद, तनिष्का माकडे, स्वरा कुसनेनवार, शार्दूल लवटे, सार्थक कापर्तीवार , विहान्त कोंडावार, रुद्र कोंडावार, प्रिन्स बजाज, सर्वज्ञ कैलासवार, रिद्धी धोटे, स्वरा मिलमीले, अरण्या नांदेकर, स्वरा महाजन, सिद्धी मेलकेवार, आरुषी राठोड, विहान मच्छेवार, जानवी चौधरी, श्लोक वडस्कर, अक्षरा चिट्टलवार, रिया ठाकरे , सावरी धाडवे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी सुंकरवार व कुमुदिनी सातपुते यांनी केले तर उपस्थितांचे आभार हिर पटेल हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नरेंद्र लोखंडे , गौरव राजूरकर, सारिका पेंदोर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.