शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :- तालुक्यासह गावागावात आरक्षणाची ढग कायम करण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून आज दिनांक ६ डिसेंबर रोजी सेलू तालुक्यातील देऊळगाव गात, डासाळा, लाड नांद्रा, खवणे पिंपरी, राधे धामणगाव, येथील सकळ मराठा समाजाने सेलू शहरातील साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान पदयात्रा काढली. ही पदयात्रा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून ते गोविंद बाबा चौक, सारंगी गल्ली, आठवडी बाजार, शनी मंदिर, पांडे गल्ली, सुभेदार गल्ली ते गणपती मंदिर करून ही पदयात्रा लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ येऊन साखळी उपोषणास पाठिंबा देऊन साखळी उपोषण करणार आहे. या पदयात्रेमध्ये एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच मिळाले पाहिजे, जय भवानी जय शिवराय, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले हा लढा जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत सुरू राहणार. सरकारने मराठ्याचा अंत पाहू नये. लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे. असा सल्ला सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला या पदयात्रेत कॉलेज तरुण, तरुणीसह देऊळगाव गात, डासाळा, लाड नांद्रा, राधे धामणगाव, खवणे पिंपरी, येथील सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने हजर राहून आपली उपस्थिती लावली होती.