कैलास पाटेकर
ग्रामीण प्रतिनिधी ढोरजळगाव
दि 6-भारतातील सर्वसामान्य दलित ,पीडित आणि अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे प्राप्त झाला आहे. संविधानाची मांडणी करून महत्वाची देणगी भारताला देऊन जगातील सर्वोच्च तत्ववेत्याचे स्थान मिळवले असे प्रतिपादन श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त ढोरजळगाव येथे बोलताना केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थिनी कु.बकाल स्वाती,देशमुख सृष्टी,बनकर यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय आणि सामाजिक कार्य उपस्थितांसमोर मांडले.विद्यालयातील शिक्षक प्रा.रामदास गायकवाड यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील खडतर परिस्थिती व त्यातून मिळवलेलं शिक्षण ,वंचित घटकासाठी उठवलेला आवाज,जातीभेद निर्मूलन याबाबत केलेलं कार्य आपल्या मनोगतातून सांगितले.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्रीम.पूनम वाबळे यांनी केले तर सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले.