शालेय विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट प्रतिसाद..
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पोलीस स्टेशन पातुर दि. 03/12/2023 रोजी महिला व बालक यांचेवर सुरक्षात्मक उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे डॉ.एच.एन.सिन्हा कॉलेज हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमांमध्ये तुळसाबाई कावल महाविद्यालयाचे विद्यार्थी, शहा बाबू हायस्कूलचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, सय्यद गफारिया सय्यद हुसेन उर्दू हायस्कूल चे विद्यार्थी, केजीएन स्कूलचे विद्यार्थी, आल हाज सलीम जकीर या उर्दू स्कूलचे विद्यार्थी तसेच येजू वेला पब्लिक स्कूलचे विद्यार्थी असे मिळून ३५० ते 400 विद्यार्थी व शिक्षक स्टॉप हे हजार होते. सुरक्षात्मक उपाय योजनेचा मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला.तसेच अकोला अप्पर पोलीस अधीक्षक मा.अभय डोंगरे साहेब यांचे स्वागत द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहू. शैक्षणिक संस्था पातूर व राजबोधी बहू. संस्था तसेच युवा समिती तर्फे पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला दामिनी पथकाचे एपीआय देवकर मॅडम, हेट कॉन्स्टेबल गोपाल मुकुंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच जनजागृती च्या व्हिडिओ क्लिप मुलां – मुलींना दाखविल्या त्याचे वर सुरक्षात्मक उपाय म्हणून योग्य ते मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला, मा.अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, तसेच प्राचार्य किरण खंडारे डॉ.एच.एन.सिन्हा कॉलेजचे प्राचार्य किरण खंडारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच पत्रकार बांधव, युवा समिती व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून मोठया प्रमाणात उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.