मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच शाखा हिवरखेड च्या वतीने दि.26 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत प्रेरणादायी विचार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये दररोज विविध विषयांवर मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण दररोज संध्याकाळी 7 वाजता गूगल मिट व फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना आपल्या घरीच मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या सहाय्याने बघता येणार आहे. सदर प्रेरणादायी विचार या व्याख्यानमाले मध्ये 26 जुलै रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन मा.राजेश पाटिल ताले व राजदादा घुमनर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.निखिल भड यांच्या उपस्थित पार पडणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौंतेय भोपळे हे करतील.त्यानंतर 27जुलै रोजी प्रा. ततेश पेटे,28जुलै रोजी प्रा. गौतम इंगळे ,29जुलै रोजी बोधी रामटेके,30जुलै रोजी मनीषजी गिऱ्हे,31जुलै रोजी ज्ञानदा गिर्हे, 1ऑगस्ट रोजी प्रा.निखिल भड,2ऑगस्ट रोजी प्रा.कौस्तुभ भोपळे,03ऑगस्ट रोजी वैष्णवी अतकरे यांचे मार्गदर्शन होणार आहे.सर्व नागरिकांनी,युवकांनी 3ऑगस्ट पर्यंत दररोज घरबसल्या विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन आयोजक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच शाखा हिवरखेडचे अध्यक्ष शिवा ओंकारे यांनी केले