सुधीर जाधव.
जिल्हा प्रतिनिधी, सातारा.
सातारा : अंबवडे बु. येथे बारा वर्षाची किल्ले स्पर्धेची परंपरा असलेले अंबवडे बुद्रुक गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या दिमाखात बक्षीस वितरण सोहळा पार पडला. दरवर्षी मोठमोठे व्याख्याते आणण्याची परंपरा या गावानं जपली आहे शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मोठ-मोठे विचारवंत दरवर्षी येथे येतात. यावर्षी माजी सनदी अधिकारी माननीय इंद्रजीत देशमुख साहेब हे आले होते. युवा पिढीसाठी शिवरायांचे विचार या विषयावर त्यांनी फार मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये सरांनी मोबाईलचा अतिवापर याचे धोके तसेच आत्मनिर्भर ,नोकरी ,व्यसन या विषयावर तरुणांना मार्गदर्शन केले, त्याचबरोबर शिवरायांचा आदर्श कसा घ्यावा याची उत्तम उदाहरणे सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये दिली.
अंबवडे येथील मुलं फक्त किल्ले बनवत नाही तर त्याचा इतिहासही जागवतात. दरवर्षी या गावात 40 ते 50 मोठे मोठे किल्ले, दोन गुंठे या आकाराचे तेही हुबेहूब बनवलेले असतात. त्याचबरोबर त्या किल्ल्यांचा इतिहास पण मुलं सांगतात. यावर्षी मुलांनी परांडा, कलावंतीण दुर्ग, राजगड, कंक्राळा, रामशेज, पारगड, सरसगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, तिकोना, अजिंक्यतारा, पद्मदुर्ग, शिवनेरी, वैराटगड, लोहगड, सिंहगड, दातेगड, इत्यादी किल्ले हुबेहूब बनवले होते.पर्यटकांना फक्तत किल्लेच नाहीत तर बाल मावळ्यांनी सांगितलेले इतिहास ऐकून मन भरून जात होत. यावर्षी जवळपास एक ते दीड लाख लोकांनी पाच दिवसात किल्ल्यांचे गाव अंबवडे ला भेट दिली. साताराच नव्हे तर कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सांगली, इतकंच काय पण बेंगलोर – कर्नाटक वरूनही प्रेक्षक किल्ले पाहण्यासाठी आले होते. महाराजांच्या काळात कसा असेल तश्या वास्तु तयार करून मांडल्या होत्या, त्याचबरोबर जिवंत देखावा सादर केले होते. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, रोख रक्कम व प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. हे सर्व परीक्षणाचे उद्धव पवार सर, सचिन सावंत सर, घाटगे सर, प्रताप फडतरे सर सातपुते सर यांनी हे शिवधनुष्य उचलले होते. कार्यक्रमास विभागातुन पंचक्रोशीतील लोकांबरोबरच साताराहून सुद्धा अनेक जण इंद्रजीत देशमुख सर यांची व्याख्याना ऐकण्यासाठी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथुन माने सर यांनी केले. तर कार्यक्रमाची प्रस्तावना स्पर्धेचे आयोजक मनवा फाउंडेशन चे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केली. तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केले.


