कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आदिवासी गोवारी समाजामार्फत आदिवासी गोवारी शहीद ११४ समाज बांधवांना दिनांक 28 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली. नागपुर येथे २३ नोव्हेबर १९९४ रोजी आपल्या हक्काच्या आरक्षण साठी विधान भवनावर निघालेल्या मोर्चात आदिवासी गोवारी समाजाचे ११४ समाज बांधव शहिद झाले होते.शहीद बांधवांना श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी फाउंडेशनचे अध्यक्ष चंदन कोहरे यांनी केले होते….या कार्यक्रम मध्ये सुभाष सोनोने,साहेबराव वाघाडे यांच्या सोबत उमेश ठाकरे, निशांत चौधरी,सागर ठाकरे, गजानन ठाकरे,सुरज शेन्द्रे, गजानन राऊत,संजय राऊत, पंचंफुला राऊत, कविता ठाकरे, सविता सहारे,संगिता चौधरी आणि असंख्य आदिवासी गोवारी समाज बांधव मोठया संख्येने ऊपस्थित होते.