बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी,पुरंदर
सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे पदवी व पदविका औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य तपासणी कॅम्प घेण्यात आला. शासकीय ग्रामीण रुग्णालय सासवड यांच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये एच. आइ. व्ही., रक्तातली साखर, एच बी, रक्तातील घटक, थायरॉईड फंक्शन टेस्ट,ब्लड प्रेशर व वजन या चाचण्या डॉ. श्रीनिवास कोलोड – वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आल्या. यावेळी मा. जि. डी. शिंगटे- समुपदेशक आइ.सी.टी.सी. ग्रामीण रुग्णालय सासवड, मा. स्वाती वाघोले लॅब टेक्निशिअन ग्रामीण रुग्णालय सासवड, मा. गोपी जाधव – महालॅब टेक्निशिअनएन, सासवड, मा. आशा कुंभारकर – सौदामिनी संस्था आदी उपस्थित होते अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमासाठी उप प्राचार्या डॉ.स्मिता पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अश्विनी कुंजीर, प्रा.सुनिता बाठे, प्रा . सायली चव्हाण यांनी केले.









