बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी, पुरंदर
यावर्षी तर पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पाण्याचा भयंकर तुटवडा जाणवत आहे .येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक समस्या उग्र रूप धारण करणार आहेत. त्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण करून पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. दुष्काळग्रस्त स्थितीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा ,असे आवाहन भाजप नेते बाबाराजे जाधवराव यांनी केले. दिवे( ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जाधववाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत 19 कोटी रुपये योजनेच्या पाईपलाईनच्या कामाची भूमिपूजन बाबा राजे जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली दिवे ग्रामपंचायतमाफॅत घोरवडी धरणातून जलजीवन मिशन अंतर्गत दिवे पंचक्रोशीला या पाणीपुरवठा योजनेचा फायदा होणार आहे. योगेश काळे ,सरपंच दिवे. यावेळी दिवे ग्रामपंचायत सरपंच योगेश काळे, माजी सरपंच आमित झेंडे, गुलाब तात्या झेंडे, माजी उपसरपंच भारती आढागळे, ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव ,राजेंद्र काळे, ऋषिकेश जाधवराव, अतुल जाधव, विठ्ठल जाधव राव, नारायण जाधवराव, दत्ता जाधवराव, आनंद आढागळे, निखिल आडगळे, बाबा काळे, स्वप्नील काळे, आदी जाधव वाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक ऋषिकेश जाधवराव यांनी केले. सूत्रसंचालन निखिल अडागळे यांनी केले. तर आभार निलेश जाधवराव यांनी मानले.









