बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी पुरंदर
सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी येथील पूनम बाबुराव गायकवाड यांची नुकतीच राजुरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.उपसरपंच पदाच्या निवडी साठी पुनम गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच इर्षा भगत ह्या होत्या. निवडणूक प्रक्रिया ग्रामसेविका आश्लेषा रोकडे यांनी पार पाडली.यावेळी पुनम गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच ईषा भगत ,सर्कल भाऊसाहेब भामे, माजी सरपंच उद्धव भगत, चेअरमन कैलास भगत, उद्योगपती संजय वाडेकर, सागर चव्हाण, सुधाकर भगत, बाबू महानवर, मारुती महानवर, राहुल गायकवाड, दत्ता गायकवाड, बापू गायकवाड ,विजय गायकवाड, नाथा भालेराव, सुरेश पाटील, संभाजी आबा चव्हाण ,प्रकाश भगत ,रत्नाबाई चोरघडे, रत्नप्रभा भगत, मोहिनी गायकवाड, शारदा गायकवाड, तात्या गायकवाड, कमलाकर भगत, संपत चोरघडे, तुकाराम आबा गायकवाड, संदीप शेंडगे ,अमोल चव्हाण, माऊली शेंडगे, संतोष गाडेकर, बाळू आप्पा चव्हाण, लहू मानवर, विजय वाडेकर, सोन्या प्रकाश गाडेकर, भाऊ भगत, संपत शेंडगे, दीपक माकर, नागेश देशमाने, भीमा देशमाने, किशोर भगत, दत्ता उगले, दादा शिवरकर इत्यादी उपस्थित होते.
सागर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.माजी सरपंच उध्दव भगत यांनी मनोगत व्यक्त केले. आभार राहुल गायकवाड यांनी मानले.

