शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड अंतर्गत येत असलेल्या दिंडाळा येथील चिल्ली टी पॉइंट ते दिंडाळाकडे जाणारा 800 मीटरच्या रस्त्यावर 35 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण केले जात आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून दगड व ऑइल मिश्रित डांबर टाकून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या कामाची तपासणी व मोजमाप करून दोषी संबंधित ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर संबंधित कंत्राट दारावर चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे चिल्ली इजारा टी पॉईंटपासून जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार फंडातून निधी मंजूर केला. त्याचे काम एका चांगल्या ठेकेदाराच्या माध्यमातून होणे अपेक्षित असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिले असल्याचे सांगण्यात आले. असून संबंधित ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम थातूरमातूर व दर्जाहीन पद्धतीने शासकीय नियम व निकष बासनात गुंडाळून केल्याचे दिसत असून अशा पद्धतीने केलेल्या निकृष्ट कामाला जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड येथील उपविभागीय अभियंता व अभियंता यांनी या निकृष्ट कामाला पाठबळ देत संबंधित कंत्राटदारांनी
केलेल्या कामाकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकाऱ्यांकडून होत आहे, असा आरोप निवेदनकर्त्याकडून करण्यात आला. असून सदरचे काम कोणतेही नियमाला धरून करण्यात आले नसून यामध्ये साईड पट्टया करण्यात आलेल्या नाहीत. दहा फूट रुंदीचा रस्ता जेमतेम आठ ते साडेआठ फुटातच असल्याचे प्रत्यक्षात दिसत असून दबाईसाठी रोलरही वापरण्यात आले नाही दिडाळा या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. बीबीएम चे काम झाले असून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गिट्टीवरून भराई व दबाईसाठी रोलरचा वापरदेखील झाला नाही. त्यामुळे रस्ता अल्पजीवी ठरतो की काय? अशी भिती उमरखेड येथील पत्रकार शेख इरफान व रितेश पाटील कदम यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम थातूरमातूर पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोपही तक्रार कर्त्यांनी दिलेल्या निवेदनातून आहे.
( चौकट)
निकृष्ट कामे करणाऱ्या त्या कंत्राटदाराला राजकीय पाठबळ,! एकीकडे शासन ग्रामीण रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असले तरीही अशा पद्धतीने निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काही राजकीय पक्षाचे नेते पाठबळ देत असल्याचा आरोप जनसामान्यातून होत असल्याचे दिसत आहे यातच या कामाच्या कंत्राटदाराचे राजकीय हितसंबंध तालुक्यातील काही बड्या नेत्यासोबत असल्याची चर्चा आता सर्वत्र उमटत असल्याचे वास्तव पुढे येत आहे