प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२६ नोव्हेंबर काल पाथरी येथे परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी पाथरी येथे आले असता पाथरी येथील समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच त्यांचे सोबत त्यांच्या पत्नी सौ अमृता जोशी आल्या होत्या व अनिलराव कुलकर्णी व सौ अंजली कुलकर्णी आपण आल्या होत्या सर्वांचा सत्कार पाथरी येथील समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सौ अमृता जोशी व सौअंजली जोशी यांचा सत्कार सौअलका प्रकाशकेदारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाथरी तालुक्याची कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. पाथरी तालुका अध्यक्ष वैभव विलासराव मुळे, उपाध्यक्ष मकरंद प्रभाकर राव पाठक,कार्याध्यक्ष मनोज पांडुरंग केदारे ,पाथरी तालुका संपर्कप्रमुख मनोज पाथरीकर, परभणी जिल्हा संघटक अशोक केशवराव जोशी, परभणी जिल्हा संघटक गोविंदराव जोशी, व महाराष्ट्र संघटक पदी प्रकाश राजेभाऊ केदारे यांची नियुक्ती गजाननराव जोशी यांनी जाहीर केली आहे. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार अध्यक्ष गजाननराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समाजासाठी व समाजकार्यासाठी एकजुटीने राहून समाजकार्य करू अशी ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांनी गजानन जोशी यांना दिली येणाऱ्या३० नोव्हेंबर रोजी बीड येथे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक व स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनस सर्वांना आमंत्रित केले आहे तसेच पाथरीतील शिखर महा संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मीकांतराव दडके हजर होते यांचा पण यावेळी सत्कार करण्यात आला येणाऱ्या २९ नोव्हेंबर रोजी पाथरी येथून दि.२८ नोव्हेंबर रोजी जालना येथे दीपक रणनवरे उपोषणास गांधी चमन जालना येथे बसणार आहे या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी पाथरी येथून सर्व समाज बांधव जाणार आहेत असे या बैठकीत ठरले आहे. उद्या दि.२८ नोव्हेंबर रोजी नामदेव नगर येथील विठ्ठल मंदिरात परशुराम संस्कार सेवा संघ व समाज बांधवांच्या वतीने कार्तिक मास समाप्ती निमित्त पंगतीचे आयोजन विठू गुरु वझुरकर वसुधाकर गुरु गोळेगावकर प्रकाश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे