सचिन डोळे: ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर :राज्यामध्ये राष्ट्र वादी पक्ष फुटी नंतर प्रथमच इंदापूर तालुक्यामध्ये शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाने लोकप्रिय खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या उपस्थितीत तालुक्यांतील कार्यकारणी जाहीर केली यामध्ये कुंभरगावं ग्राम पंचायत चे माझी सरपंच सौ जयश्री ताई धुमाळ यांची इंदापूर तालुका कार्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच इंदापूर तालुका युवक सचिव पदी ज्ञानराज कुंडलिक धुमाळ यांची निवड करण्यात आली
या दोघांनी ही आपण आज पर्यंत पवार साहेब यांच्या विचारांचे समाजाच्या विकासाचे प्रश्न सोडवत आहोत आणि समाजकारण करत आहोत आणि या पुढे ही पवार साहेब यांचे विचार घेऊन आम्ही समाजासाठी कार्य करीत राहणार असा विश्र्वास व्यक्त केला
यावेळी कुंभरगाव चे माझी सरपंच श्री कुंडलिक धुमाळ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन गोरे,संदीप धुमाळ,महादेव धुमाळ,कल्याण धुमाळ, संजय धुमाळ, अतुल धुमाळ,मनीषा ढोले, वैष्णवी पोटे, सोनाली गोरे इ उपस्थित होते.