कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद: शहादा तालुक्यातील जवदा तर्फे बोरद येथील १४ वर्षीय मुलीवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तसेच तीन जन जखमी असल्याने जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे तसेच मृत सपना हिला शवविच्छेदनासाठी नेले असता डॉ. हजर नसल्याने नातलगांनी आक्रोश व्यक्त केला आहे.आमदार राजेश पाडवी यांनी डॉक्टररांशी संपर्क केल्याने लागलीच मदतकार्य सुरू झाले.सविस्तर वृत्त असे की,जावादा तर्फे बोरद येथील सपना राज ठाकरे ही सकाळी .०८.०० वाजेपासून मजुरांसोबत कापूस वेचण्यासाठी गेली होती. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अचानक दुपारी ११.०० वाजेनंतर जोरदार पावसास सुरुवात झाली पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाट झाला त्यावेळी ती व तिच्या जवळ तीन मजूर होते व सर्वजण एका झाडाखाली बसले होते. अचानक झाडावर वीज कोसळली ती सपना राज ठाकरे व १४ वर्षे हिच्या अंगावर पडली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत ह्यांना रुग्णालयात दाखल केले असून मयत सपना हिला शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असता रुग्णालयात डाक्टर शवविच्छेदन होऊ शकले नाही व जमहमींवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत, मयत झालेल्या सपनाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला व आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला ते ह तेलंगाना येथे पक्षाच्या प्रचारासाठी गेले असताना सुद्धा त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरित जखमीवर उपचार करण्याचे आदेश दिले.मृत्यू पडलेल्या सपना राजू ठाकरे हिचे सर्व विच्छेदन करून त्वरित नातेवाईकांना देण्यास सांगितले त्यामुळे जावदे येथील ग्रामस्थांनी आमदार राजेश पाडवी यांचे आभार मानले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)