कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद :अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यात चांगलीच धांदल उडाली आहे. रविवार रोजी दुपारपासून तळोदा तालुक्याला चांगलेच झोडपले असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान तालुक्यातील गृप ग्रामपंचायत इच्छागव्हाण मधील सावर येथील मोगीबाई सोत्या वसावे यांच्या घरावर झाड उन्मळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघडयावर आले आहे. याबाबत सदरील माहिती गावात राहणारे रहिवासी अशोक वसावे यांनी दिली आहे. तरी सावर येथील घराचे तत्काळ पांचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.






