कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराज नगरी सोनाळा येथे सर्व प्रहार कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून माजी मंत्री तथा दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष मा.बच्चुभाऊ कडू यांनी भेट दिली. श्री संत सोनाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रथाचे सुद्धा दर्शन घेतले. यामध्ये सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चुभाऊ कडू यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. सोनाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मा. बच्चुभाऊ कडू यांनी पूजन करून पुष्प अर्पन केले. त्यासोबतच वाल्मीक नगर येथील पूजनीय वाल्मीक ऋषी यांचे पूजन केले. शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी माननीय बच्चुभाऊ कडू यांचे आभार मानले.