व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधि अहेरी
अहेरी ,तालुक्यातील स्व. श्री मल्लाजी आत्राम बहुद्देशीय संस्था आलापल्ली द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली या विनाअनुदानित महाविद्यालयात 2 आणि 3 नोव्हेंबर 2023 ला NAAC टीम ने भेट देऊन महाविद्यालयातचे मुल्यांकन केलेले असून महाविद्यालयाला ‘ C’ ग्रेड CGPA 1.8 प्राप्त झालेला आहे. विशेष बाब
म्हणजे NAAC मूल्यांकन करून घेणाऱ्या यादी मध्ये स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली चा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मधील अतांत्रिक विनाअनुदानित महाविद्यालय विभागातुन पहिला महाविद्यालय असून, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत 6वा विनाअनुदानित महाविद्यालय आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव विना अनूदानित महाविद्यालय आहे.
महाविद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष श्री दीपक दादा आत्राम, माजी आमदार यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अमित कोहपरे आणि सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे.









