शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू तालुक्यात दि. 27 नोव्हें.सोमवारी पहाटेच्या सुमारास तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले.त्याच बरोबर इतर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्याला अतिवृष्टी पावसाने झोडपून काढले आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठीक ठिकाणी अचानक आलेल्या वारंवादळ आणी जोरदार पावसाने बागायती पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील ज्वारी,कापूस, हरभरा,गहू आदी पिकाचे नुकसान झाले आहे. हरभरा पिक पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्या समोर आले आहे. अगोदरच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत होता.त्यात या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सरकारने तातडीने पिकाचे पंचनामे करून झालेल्या पिकाची नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी. अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.