मोहसिन शेख,
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत:राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र वसमत येथे शुक्रवार पेठ,गडीमोहल्ला परिसरातील नागरीकांच्या आरोग्य सुविधे करिता शासनाने सुरू केलेले आहे. परिसरातील गरीब गरजू रूग्णाना सदरील केंद्राचा लाभ मिळतो गरजु रूग्ण दररोज आरोग्य केंद्रा वर येत असुन हतबल निराश होऊन परतत आहे त्यांच्या आरोग्य विषयक समस्या वाढून प्रश्न निर्माण झाले असुन मागील एक महीन्यापासुन आरोग्य वर्धिनी केंद्र बंद आहे
सदरील अत्यावश्यक सेवा असुन तात्काळ आरोग्य केंद्र त्वरीत सुरू करण्यासाठीची आरोग्य विभागाच्या संबधीत जवाबदार अधिकाऱ्यांनी कार्यवाही करूण परिसरातील नागरीकांचे समाधान करावे अशी विनंती करण्यात येत आहे.


