माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर नगरपालिकेतील सेवानिवृत्त स्वच्छता निरीक्षक सालेह बीन मुहम्मद चाऊस यांना जिंतूर रत्न पुरस्कार २०२३ जाहीर झाले असून लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. जिंतूर येथील चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येणार आहे. नगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक असतांना त्यांनी केलेले कार्य आणि खास करून कोविडच्या काळात केलेल्या कार्यमुळे त्यांना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. दिव् कोरोनाच्या काळात सर्वांच्या मनात भिती निर्माण झाली होती ज्या व्यक्तीला कोविड झाला त्या व्यक्तीपासून त्यांचे नातेवाईक मित्र परिवार दुरच असायचे आपण त्याला स्पर्श केला. तर आपल्याला ही कोरोना होईल याच भितीमध्ये असायचे अश्या कठीण काळात स्वच्छता निरीक्षक म्हणूनसालेह मुहम्मद यांनी अत्यंत जबाबदारीने आपले कार्य केलेसर्व जातीच्या लोकांच्या जात धर्म पंथ ना पाहता कोविडमुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीचा अंतीमसंस्कार करण्यासाठी त्यांनी मदत केली तसेच कोरोना काळात सोशल डिस्टंन्स कोरोना सेंटर येथील रूग्णांना जेवणाची व्यवस्था व त्यांच्या राहण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केले तसेच जिंतूर शहरात स्वच्छताचे कामे चांगल्या पध्दतीने करण्यासा त्यांनी जबाबदारी पार पाडली म्हणून त्यांना जिंतूरच्या प्रसिध्द असलेल्या जिंतूर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने जिंतूररत्न पुरस्कार २०२३ जाहीर केले आहे.अॅड. सुनिल शिवाजीराव बुधवंत अध्यक्ष जिंतूर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहे. लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थिती एका दर्जेदार कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहे. सालेह बीन मुहम्मद चाऊस यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल अनेकांनी त्यांचा अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली आहे.









