पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना स्थानिक पातळीवरच विविध महत्त्वाच्या दाखल्यांसह आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरोग्य कार्ड अर्थात आयुष्मान योजनेचे कार्ड तयार करून मिळत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने राज्यभरातील संगणक परिचालकांच्या शासनाकडे विविध प्रलंबित मागण्यांकरिता बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार १७ नोव्हेंबरपासून या संपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रामटेक तालुक्यातील ४८ ही ग्रा.पंचायतीमधून नागरिकांना तालुक्यातील ४८ ग्रा.पं.मध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत सुमारे ४७ संगणक परिचालक कार्यरत आहेत. हे सर्व संगणक परिचालक गेल्या १२ वर्षांपासून ग्रा.पं.स्तरावर प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. या संगणक परिचालकांच्या विविध दाखल्यांसह प्रमाणपत्रांसाठी ग्रामस्थांची परवड वितरित होणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण रखडण्यासोबतच विविध ऑनलाईन कामेही ठप्प पडली आहेत. संगणक चालक यांच्या माध्यमातून ई-ग्राम स्वराज, महावन, १ ते ३३ दाखले, सीएससी ट्रान्जेक्शन टार्गेटची कामे, १ ते ३३. नमुने, ऑनलाईन कामे, आयुष्मान भारत कार्ड, जन्म-मृत्यू दाखले, ई-श्रम कार्ड आदी कामांशिवाय इतर ऑनलाईन व ऑफलाईन कामेही करण्यात येतात. परंतु यानंतरही त्यांना केवळ ६९३० रुपये इतके तूटपुंजे मानधन देण्यात येते. तेही वेळेवर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. संगणक परिचालक हे ग्रा. पं. मध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करीत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असून, ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये या सर्व ग्रा.पं.च्या सुधारित आकृतीबंधात पदनिर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे. त्यात ग्रा.पं.स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शासनाच्या सर्व योजना नागरिकांना ऑनलाईन देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रा.पं.स्तरावर डेटा एन्ट्री ऑपरेटर / संगणक परिचालक या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करून किमान वेतन देण्याची गरज आहे, असे शासनाकडूनही मान्य करण्यात आले होते. त्यानुसार फाईल राज्याच्या वित्त विभागात गेल्यावर त्यात त्रुटी काढण्यात आली, असे संघटनेच्यावतीने ग्रामविकास केला आहे. मंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून मंत्रणांकडे सादर केले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता राज्यस्तरावरच शुक्रवार, १७ नोव्हेंबरपासून संगणक परिचालक संघटनांनी राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे आणि नागपुर जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश रहांगडाले यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याचे पडसाद रामटेक तालुक्यातही पहायला मिळाले असून, संगणक परिचालक संपावर गेल्याने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसोबतच अनेक ऑनलाईन व ऑफलाईन कामेही रखडली असल्याचा दावा रामटेक तालुका संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषारकुमार शनिचरे यांनी केले असून रामटेक तालुक्यातही मा.गट विकास अधिकारी जयसिंग जाधव आणि आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक अमित गायधने यांना रामटेक तालुका कडून निवेदन देण्यात आले. या प्रसंगी रामटेक तालुका संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषारकुमार शनिचरे, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, सचिव सचिन शिवणे आणि तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.