रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून डॉक्टर भूषण भास्करराव कोरडे या विद्यार्थ्याने एमबीबीएस, डीसीएच, डीएनबी आणि डीएम सारखी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन करणे ही हिवरखेड सारख्या गावा साठी भूषणावह बाब असून त्याच्या या यशात मोहम्मद इसाक सर यांचा फार मोठा वाटा आहे असे उद्गार लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी काढले. हिवरखेड येथील डॉक्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर भास्करराव कोरडे यांचे चिरंजीव डॉक्टर भूषण यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा तसेच जिल्हा परिषद हिवरखेड शाळेत डॉक्टर भूषण चे शिक्षक राहिलेल्या व सेवानिवृत्ती नंतरही दोन वर्षापासून अडगाव जिल्हा परिषद शाळेत विनावेतन सेवा देणारे मोहम्मद इसाक मोहम्मद गनी सर यांचा सत्कार लोकजागर मंच तर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. विलास घुंगड सर यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी हिवरखेड च्या सरपंच सौ. वैशालीताई वानखडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ सुलभाताई दुतोंडे, पंचायत समिती सदस्य सौ गोकुळाताई भोपळे, उपसरपंच रमेश दुतोंडे, माजी सरपंच सुरेश ओंकारे ,पोलीस पाटील प्रकाश गावंडे, डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर भास्करराव कोरडे, मेडिकल असो सिएशनचे अध्यक्ष सुनील बजाज, शंकराव पुंडकर गुरुजी यांच्यासह डॉक्टर्स, केमिस्ट,पत्रकार व गावा तील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करीत सत्काराबद्दल लोकजागर मंच व अनिल गावंडे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिंद्रा कराळे, सूत्र संचालन निखिल भड तर आभार प्रदर्शन मनीष भांबुरकर यांनी केले.