संजय भोसले
तालुका प्रतिनिध,कणकवली
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील, मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतु मा.शैलेशजी टिळक विश्वस्त, दै.केसरी,लोकमान्य टिळक विचारमंच यांनी भेट दिली.तळेरेगावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी महाविद्यालय व गावाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी शैलेश टिळक यांनी महाविद्यालयाच्या कामाचे कौतुक केले व उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकवर्गाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मा. यतिश बांगेरा,ज्युडो कराटे महाराष्ट्र असोसिएशन राज्य पदाधिकारी.विकास पाटील, मा.मटकर कासार्डे विद्यालयाचे क्रिडा शिक्षक दत्तात्रय मारकड , सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, मा. महाविद्यायीन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.