विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर:दिवाळी तोंडावर आली असताना इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही साखर कारखान्यानी दिवाळी साठीचे बिल अदा केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी साजरी अंधारात होतेय काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.दरवर्षी इंदापूर तालुक्यात श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर, बारामती ऍग्रो यांची दिवाळी शेतकऱ्यांना ऊस बिलं देण्याची प्रथा आहे मात्र दोन दिवसावर दिवाळी आली असताना बिलं मात्र अजून कारखान्यानी दिली नाहीत त्यामुळे शेतकरी बिले नाही मिळाली तर सण साजरा करता येणार नाही. असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही पिकातून पैसे मिळाले नसल्याने दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. यामुळे कारखानादारानी शेतकऱ्यांचा विचार करून दिवाळीला बिल देण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी शेतकऱ्यांना कडून करण्यात येत आहे.