मनोज गवई
तालुका प्रतिनिधी, चांदूर रेल्वे
चांदुर रेल्वे:आज तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. तालुक्यातील कारला व पाथरगाव येथे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यासाठी दि 5 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणूकीत सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी आपल्या पक्षाचे सदस्य व सरपंच निवडणूकीत विजयी होण्यासाठी जोरकस प्रयत्न केले. पण शेवटी कारला येथील भाजप समर्थीत शुभम गिरासे गटाचे सरपंच प्रमोद कुमरे व इतर 7 सदस्य या निवडणूकीत विजयी झाले. या पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत थेट जनतेमधून सरपंच पदासाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत युवा कार्यकर्ता शुभम गिरासे गटाने आपले वर्चस्व कायम राखत 7 सदस्यांसह सरपंच पदी प्रमोद कुमरे हे बहुमताने विजयी झाले. तर पाथरगाव येथे पार पडलेल्या निवडणूकीत सरपंच पदी भाजप च्या अनीता अनील राठोड ह्या विजयी झाल्या. पाथरगाव गट ग्रा ग्रामपंचायत मध्ये चार सदस्य बिनविरोध निवडून आले. तर कळमगाव येथील एका जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत भाजप च्या प्रमिला वाघ ह्या विजयी झाल्या. निकाल घोषित झाल्या नंतर कार्यकर्त्यानी गुलाल उधळत व फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला.