झोपडी पडल्याने आई व मुलगा रस्त्यावर,
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड आठवडी बाजारात राहणाऱ्या अंधत्व असलेल्या महिलेची झोपडी दिनांक १९ जुलै च्या रात्री पावसाच्या लहरींत कोसळली सुदैवाने जीवितहानी टळली असून झोपडी पडल्याने ही महिला व तिचा मुलगा रस्त्यावर आले आहे, कित्येक वर्षांपासून ही अंधत्व असलेली महिला शासनाला घरकुल मागत असून अध्यापही कोणत्याच लोकप्रतिनिधी नेत्याने पुढाकार घेऊन या महिलेला घरकुल योजनेचा लाभ दिला नाही, हे घर कोसळल्याने हे मायलेक कुठं राहतील हालाकीच्या परिस्थिती कोण बनणार यांचा वाली असा प्रशन सध्या यांना पडला आहे शासनाने तात्काळ यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी ये निर्धार कुटूंबातील अंधत्व महिला निर्मलाबाई वारुळे व मुलगा अक्षय वारुळे करीत आहे,