अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव पोलीस स्टेशन येथे आज ओपन जिमचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. काही दिवसापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज मोठ्या वृक्षात रूपांतर झाले या पलीकडचे नवचैतन्य काय असेल बच्चन सिंह पोलीस कर्मचारी म्हणजे ऑन ड्युटी 24 तास नवदुर्गा असो गणपती विसर्जन असो किंवा इतर किरकोळ कारणे असो सर्वांचीच मुख्य भूमिका ही पोलिसांवर अवलंबून असून पोलिसांच्याही हेल्थ ही जबाबदारी दोन्ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे वाशिम जिल्ह्यातील सुत्र हाती घेताच बऱ्याच प्रमाणात जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देणारे तथा मालेगाव पोलीस स्टेशन येथे सदैव सहकार्य बजावणारे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या वतीने परिसरामध्ये विविध योजनेची अंमलबजावणी यापूर्वी होत आली आहे परिसरात सुसज्ज अशी सुंदरबन वाटिका पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे यांच्या कार्यकाळात उभारली गेली असून त्याच सुंदरबनवाटिकेमध्ये आज ओपन जिम उभारल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळात वेळ आणि धावपळ या दोन्ही संकल्पनेचा वेळेची बचत करून आवारामध्येच तेवढ्याच पद्धतीने प्रॅक्टिस साठी अनुभवता येईल यासाठी आधी कर्मचारी फिट तर सर्वच फिट या संकल्पनेने इतर तालुक्यातही लवकरच ओपन जिमचा प्रस्ताव पाठवलेल्या अनुसरून लवकरच उभारल्या जाईल असे यावेळी पोलीस अध्यक्ष बच्चन सिंह यांच्यावतीने सांगण्यात आले विशेष अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे मानवालाही रोबोटिक पद्धतीनेच आजच्या परिस्थितीमध्ये वाटचाल करावी लागत आहे दिलेले सत्कार्य आणि सहकार्य कर्तव्य हे त्याच पद्धतीने पारकरने गरजेचे आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची आज तब्येत बरोबर नसतानाही दिलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला हजेरी लावली यावेळी
उपस्थित कर्मचारी या मध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाळे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निलतायडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे पीएसआय दिलीप रहाटे,पी एस आय सारिका नारखेडे,पोलीस अंमलदार सैबेवार,गणेश बियाणी,राठोड,कैलास कोकाटेे, गजानन वाणी,आडे,काळे,उगले, रजगुरे, मेटगळे, ईगोले,चुंबळकर, विजय डोईफोडे,ठोंबळ,मुसळे, महाले,जितू पाटील,होमगार्ड सैनिक, राजगुरे,मेटागळे,तथा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक विविध मान्यवर यांची उपस्थिती लाभली.


