दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वावर वांगणी पैकी बेहेडगाव येथे दिनांक २१ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी सार्वजनिक श्री नवरात्रोत्सव मित्र मंडळ बेहेडगाव यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील लोकसहभाग वाढावा व गावातील विविध विकास कामाबद्दल चर्चा व्हावी नऊ दिवसात खूप मोठ्या उत्साहात घालवले कुठल्याही प्रकारचे वाद विवाद नाही गावकऱ्यांनी खूप सहकार्य केल या वर्षी तरुणांनी एकत्र येऊन ननवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच ठरवलं आणि ते सध्या झालं या ननवरात्रोत्सव प्रामुख्याने प्रथम सूर्या डी जे ग्रुप ओझरखेड नी तसेच नऊ दिवस लाईव्ह व्हिडीओ ग्राफर नी सुद्धा खूप सहकार्य केल तसेच गावातील दादू बुधर ,कैलास राथड,शांताराम बुधर गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ यांनी खूप सहकार्य केले.व विविध उपक्रमाचे आहोजन हे प्रविण पिठोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच विद्यार्थी जीवनात कसा चांगला प्रकारे बदल घडेल याचाच विचार करत गावात नवतरुण एकत्र येवून विद्यार्थी हे सगळेच अभ्यास करून घडत नसतात तर काही विद्यार्थ्याकडे कला,क्रीडा किंवा इतर वेगवेगळे कौशल्य अशू शकते परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेले कौशल्ये कसे बाहेर दाखवता येईल याचं उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच गावातील आणि सगळ्यासाठी महाप्रसादाचे आयोजन गावात सूख शांती लाभो यासाठी होमविधी व दसऱ्याच्या दिवशी महिषासूर चा पुतळा जाळण्यात आला व नंतर सोन लुटण्याचा कार्यक्रम असे अनेक आगळे वेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले होते या मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २५ गाणेची नोंद करून ग्रुप डान्स किंवा काही वैयक्तिक डान्स करून सर्व कलाकारांनी जवळ जवळ ३००० हजार प्रेशकांच्या समोर त्यांची अंगी असलेली कला,कौशल्य दाखवून दिले.या मध्ये प्रत्येक गाणेला मंडळाकडून वही,पेन ,आणि काही पैसे असे बक्षीस वितरण करण्यात आले.महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचाय मधील लोक जवळ जवळ दोन हजार ते तीन हजार लोक हजर होते तसेच शेवटी गौरी विसर्जन करून महिषासूर चा पुतळा जाळण्यात आला व शेवटी सोन लुटण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे आयोजन नवतरुण मित्र मंडळ बेहेडगाव व गावातील संपूर्ण ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने व अभय पिठोले,सचिन बुधर ,दिनेश भोये व प्रवीण पिठोले पत्रकार यांच्या पुढाकाराने वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षक चौधरी सर जाधव सर ,गवळी सर पत्रकार सुनील जाबर तसेच वावर वांगणी ग्रामपंचायत चे उपसरपंच रमेश बीज यांची उपस्थिती लाभली .











