अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी घाटंजी
घाटंजी : तालुक्यातील पंगडी येथील आरोपी अमोल विनायक मुनेश्वर (वय 39, रा. पंगडी) याची विनयभंग प्रकरणातून घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा पिठासिन अधिकारी ए. ए. कळमकर यांच्या न्यायालयाने भादंवि 354, 323 प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी काम पाहिले. तर शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी शासनाची बाजु मांडली. दिनांक 17 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 7.30 वाजता सायतखर्डा रस्त्यावर फिर्यादी महीला शौचालयास गेली होती. आरोपी हा त्याच रस्त्याने जात होता. त्यामुळे फिर्यादी महिला ही उभी झाली. तेवढ्यात आरोपी हा सदर महीले जवळ जाऊन तिचे हात धरुन तिला खाली पाडले व तिचे तोंड दाबले. तसेच आरोपीने फिर्यादी महिलेला चावा घेतल्याने ती जोर जोराने ओरडु लागली. तेवढ्यात पंकज काकडे, शिवराम राउत, अनंता भोयर व सज्जन कुंभारे हे घटनास्थळी धाऊन आले. तदनंतर आरोपी अमोल मुनेश्वर हा हाताला झटका मारुन पळुन गेला. आरोपीने फिर्यादी महिलेला वाईट उद्देशाने तिचा हात पकडला व तिला खाली पाडले. अशा लेखी तक्रारीवरुन आरोपी अमोल मुनेश्वर विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवुन जमादार प्रदीप मेसरे यांनी तपासात घेतला. तपासाअंती आरोपी विरुद्ध पुरेसा पुरावा असल्याने घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष म्हणजे घटनेच्या 15 दिवसा अगोदर आरोपी कडुन फिर्यादीने ₹ 500 उधार मागितले होते, हे येथे उल्लेखनीय. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा पिठासिन अधिकारी ए. ए. कळमकर यांनी आरोपी अमोल विनायक मुनेश्वर याची निर्दोष मुक्तता केली. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी शासनाची बाजु मांडली. तर आरोपीतर्फे ॲड. अनंतकुमार पांडे यांनी काम पाहिले. आरोपी अमोल मुनेश्वर याची भादंवि कलम 354, 323 प्रकरणातुन निर्दोष मुक्तता झाल्याने आरोपीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 437 – ए मध्ये नमुद प्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीत करिता रुपये 15,000 चे वैयक्तिक बंधपत्र व तितक्याच रकमेचे जामीन पत्रे द्यावे, असा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी दिला आहे.