मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
शारदीय नवरात्रोत्सवाच्या औचित्याने शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने ‘जागर स्री शक्तीचा, सन्मान नवदुर्गांचा’ या महिला सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असुन रायगड लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम व जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या संकल्पनेतून रायगड लोकसभा मतदार संघाच्या प्रत्येक तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने श्रीवर्धन येथे नवदुर्गा सन्मान सोहळा शनिवार दि.२१आॕक्टोबर रोजी श्रीवर्धन विधानसभा संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर,उप जिल्हा प्रमुख नंदू शिर्के,तालुका प्रमुख अविनाश कोळंबेकर, शहर प्रमुख राजेश चव्हाण,शिवसेना महिला तालुकाप्रमुख दिक्षा टाकळे, शहर प्रमुख प्रियांका कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील हरेश्वर माजी सरपंच साधना मांदाडकर,हरेश्वर ग्राम पं.सदस्य स्मिता पोवार,मारळ माजी सरपंच स्मिता चाचले, शिक्षिका हर्षदा पोलेकर,अस्मिता नलावडे,संगीता भगत,अंगणवाडी सेविका व हॉटेल व्यावसायिक प्रियंका कदम,सह्याद्री महिला ग्रामसंघ बोर्लीपंचतन अध्यक्षा मानसी जाधव,गालसूरे शिवण क्लास शिक्षिका ओवी मोहिते,वडघर येथील सामाजिक कार्यकर्त्या माजी सरपंच लक्ष्मी मोकल या महिलांच्या त्या त्या क्षेत्रातल्या कार्याची दखल घेऊन त्यांना नवदुर्गा सन्मानपत्र आणि साडी भेट देऊन गौरविण्यात आलं.याप्रसंगी उपतालुकाप्रमुख जूनेद दुस्ते,युवासेना शहर प्रमुख शिवराज चाफेकर,उप शहर प्रमुख शादाब पटेल,शिवसेना रायगड अल्पसंख्यांक अध्यक्ष मसूद दर्जी, जिल्हा संघटक अरुण शिगवण, विभाग प्रमुख संदीप रीकामे,माजी विभाग प्रमुख प्रमोद दुदूसकर,माजी महिला तालुका प्रमुख शलाका पोलेकर,माजी नगरसेविका मालती राणे,माजी उपसभापती प्राची दुदूसकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या नऊ दुर्गांच्या कार्याची ओळख करुन देत या कार्यक्रमाचं सुत्र संचालन दिक्षा टाकळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रियांका कदम यांनी केलं. नवदुर्गा सन्मान प्राप्त माहिलांनी आमच्या कार्याची दखल घेउन आम्हाला प्रोत्साहीत केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.