सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हीवरा आश्रम:महाराष्ट्राच्या भूमीत सामाजिक दृष्टिकोन जोपासून आज पर्यंत साधू-संत कर्मयोगी समाज सुधारक. यांनी कार्य केले आहे. हिवरा आश्रम येथे स्वामी शुकदास महाराज यांनी निस्वार्थपणे समाजसेवेची मुहूर्तमेढ रोवली , त्याच विचाराने या परिसरात अनेक व्यक्ती कार्य करीत आहे.
प्राचार्य पंढरीनाथ शेळके हे महाविद्यालयीन जीवनापासून समाजसेवी वृत्तीचे आहेत. व्यसनमुक्ती ,दिव्यांग सेवा, वृक्षारोपण आणि कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून ते कार्यरत आहेत. “आषाढी एकादशी” त्यांचा जन्मदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमाने साजरा करतात. यावर्षी. वाढदिवसानिमित्त आई पासूनअनाथ झालेल्या चि. आदित्य. कु. गायत्री. यांच्या पुढीलआयुष्यासाठी मदत म्हणून११००/ आर्थिक मदत केली ., गरजू दिव्यांग व्यक्ती संजय कांबळे. यांना अन्न धान्य व नित्यानंद अनाथालय मधील 27. मुलांना खावू देवून गरजेच्या वस्तूसाठी खर्चासाठी अल्पशी मदत केली. वाढदिवसानिमित्त. अनाथालयातील सर्वात लहान ४वर्षाच्या मुलगा चि.कार्तिक यास जवळ घेवून त्याला गुच्छ व तोंडात स्वीट देवून वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस आपला नसून त्यांचा आहे. या भावनेतून साजरा केला.
मनोगत व्यक्त करताना. प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी आवाहन केले. वाढदिवस हे निमित्त असते. समाजातील गरजू,अनाथ, उपेक्षित घटक यांच्या साठी प्रत्येक सक्षम व्यक्तीने मदतीचा हात पुढे करुन सामाजिक जाणिवेची जोपासना करण्याची विनंती केली.हा जीवनात आनंदाचा क्षण असतो.नित्यानंद गरजू व अनाथ आश्रमाचे संस्थापक अनंत शेळके बाबत बोलताना.म्हणाले. चार भिंतीच्या पुढे जाऊन. सरांनी हा जाणीवेचा वटवृक्ष उभा करून. 27 गरजू व अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून सेवाकार्य. शेळके सर करतात. पू. शुकदास महाराज यांचा सेवाव्रती कार्याचा विचार अंगीकारत,हे काम गरजू व अनाथ मुलांसाठी. सुरू आहे. निश्चितच हे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला अल्पशी मदत करूया . दिव्यांग व्यक्ती. संजय कांबळे. यांच्या. परिवारासाठी. वाढदिवसानिमित्त. अन्नधान्य देण्यात आले. शेळके परिवार व मित्रमंडळ आयोजित केलेल्या, सामाजिक जाणिवेच्या वाढदिवस कार्यक्रमात विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरहाते, ग्रामसेवक संघटना मेहकर तालुकाध्यक्ष दता काळे, प्रसिद्ध कथाकार. बबनराव महामुने, पत्रकार समाधान म्हस्के पाटील, पत्रकार संतोष थोरहाते, नित्यानंद अनाथालय आश्रमाचे अनंतराव शेळके. नंदकिशोर शेळके,दीपक पंचाळ, मंडळ अधिकारी राजेश आव्हाळे.लोकजागर कला मंच.चे.अध्यक्ष शाहीर ईश्वर मगर, दूरदर्शन कलावंत सुभाष सवडतकर. रामेश्वर गाडेकर व मुले कार्यक्रमाला उपस्थित होते.विवेकानंद आश्रमाच्या वतीने प्राचार्य पंढरीनाथ शेळके अभिष्टचिंतन शाल श्रीफळ देऊन अशोकराव थोरहाते उपाध्यक्ष यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. विद्यार्थी. ओम नवले यांनी केले.मुलांना खाऊ देऊन. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











