दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: जे शिक्षण आज महिलांना मिळत आहे त्यासाठी सावित्रीबाई फुले ह्या महिलांसाठी शिक्षणक्षेत्रातील खऱ्या अर्थाने देवीसमान आहेत.अशा विविध क्षेत्रातील महिला आम्हा सर्वांना आदर्शवत आहेत.ज्यात कल्पना चावला,प्रतिभाताई पाटील,द्रौपदी मुर्मु हे जिवंत उदाहरण आहे.त्यांना तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि आपलं उद्दिष्ट गाठा असे मनोगतातून त्यांनी आपले मत व्यक्त केले.औचित्य होते मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज बोरद येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताचे.हा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य निलेश सूर्यवंशी,व पर्यवेक्षक भटू पवार यांचा मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत रोज नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठिक ०४.०० वाजता शिक्षक तसेच विद्यार्थी उपयोगी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला व्याख्यात्या म्हणून जायन्ट्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड.संगीता पाटील ह्या उपस्थित होत्या.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी,तर प्रमुख पाहुणे म्हणून विशाखा समितीच्या अध्यक्षा शारदा माळी ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे,व आदिवासी समाजाच्या कुलदेवता देवमोगरा मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.शाळेत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यात रांगोळी स्पर्धा या प्रामुख्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.विद्यार्थ्यांच्या काढलेल्या रांगोळ्या व त्यांची मनमोहक अशा रांगोळी स्पर्धेला भेट देण्यासाठी संस्थेचे संचालक तथा शेठ के.डी. हायस्कूलचे मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी तसेच निलेश माळी यांनी भेट देऊन रांगोळ्यांची पाहणी केली.व विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.कार्यक्रम सुनियोजित रित्या पार पडावा यासाठी शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी ज्यात प्रामुख्याने शिपाई सुरेश शिरसाठ,सचिन इंगळे ,मोहन नाईक यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन सुभाष पाडवी यांनी केले तर आभार दर्यावसिंग राजपूत यांनी यांनी मानले.


