मधुकर बर्फे,
तालुका प्रतिनिधी पैठण.
छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील चितेगाव येथे किरकोळ कारणावरून घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये वाद होउन हाणामारी हुसनारा खातुन मोहम्मद वय ३० वर्षे आफताब आलम मोहम्मद रा. चितेगाव ता. पैठण हे दोघे पती पत्नी १९ ऑक्टोंबर गुरुवार रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घरी असताना घराशेजारील राहणारे गणेश जाधव दारू पियून आला पती पत्नी दोघांमध्ये घरगुती विषय चालू होता, त्यावरून गणेश जाधव ला असे वाटले हे दोघे मला बघुन हासले म्हणून वाद व शिवीगाळ झाले असता, गणेश जाधवची पत्नी रेखा जाधव व वडील घराबाहेर येऊन तिघांने लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी हुसनारा खातुन व मोहम्मद आफताब आलम पती पत्नी यांना मारहाण करून जखमी केले.
याबाबत बिडकिन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











