सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन आज सायंकाळी 4.00 वाजता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उद्योजकता,व कौशल्य विकास मंत्री ना. मंगल प्रभात लोढा आदींच्या उपस्थितीत पार पडले यावेळी हिसवळ खुर्द येथील दत्त मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी गटनेते श्री राजेंद्र पवार, मनमाड चे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, योगेश(बबलू) पाटील, मा.जि.प.सदस्थ डॉ.विजय कदम, बाजार समितीचे मा.सभापती किशोर लहाने, डॉ.वाघचौरे साहेब, सरपंच कैलास फुलमाळी,उपसरपंच संजय आहेर, सदस्य -नानासाहेब आहेर, संदिप आहेर,बंडुकाका आहेर,सुदाम आहेर, सरस्वती लोखंडे, ग्रामसेवक मनिष भाबड, तलाठी ननई, नांदगाव येथील आयटीआय कॉलेजच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडम, आदिंसह गावातील परिसरातील ग्रामस्थ, महिला,विद्यार्थी,शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण केंद्रा मार्फत येथे सोलर टेक्निशियन चा अभ्यासक्रम लवकरच सुरू होत आहे. प्रशिक्षण केंद्र परम स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यात हिसवळ खुर्द व वेळगाव अशा दोन ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून ती मंजूर करण्यात आले आहे. आमदार सुहास कांदे यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित जि.प. गटनेते राजेंद्र पवार यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आहेर यांनी केले.