संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठ्ठा येथे नवरात्रउत्सवाचे औचित्य साधुन विविध उघ्दाटने होत असताना , व लोकसहभागातून निधी गोळा करुन केलेली कामे पाहता यातून कासार्डे गावची एकजुट यातून दिसून येते. अशाप्रकारे प्रत्येक गावातील नागरीकांनी पुढाकार घेऊन काम केले तर गावचा सर्वांगिन विकास जलद गतीने होईल. आपण करत असलेल्या कामाला माझा नेहमीच पाठींबा राहील. चौपदरीकरणा नतंर कासार्डे गावचा असा वेगळा विकास होताना पाहीले असता भविष्यात कासार्डे गाव आदर्श ठरेल. असे आम. नितेश राणे यानी कासार्डे येथील श्री. सिध्दीविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या रुग्णवाहीका, सेल्फी पॉईंट लोकार्पण,बैठक व्यवस्थाचे उघ्दाटन तसेच कासार्डे गाव नकाशाचे अनावरन कार्यक्रमात कासार्डे तिठ्ठा येथे बोलताना सांगितले. दरम्यान आम. नितेश राणे याच्या शुभहस्ते रुग्णवाहीका, सेल्फी पॉईंट लोकार्पण, बैठक व्यवस्थाचे उघ्दाटन तसेच कासार्डे गाव नकाशाचे अनावरन करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये, माजी जि.प.सदस्य संजय देसाई, माजी जि.प.सभापती बाळा जठार,माजी सभापती दिलीप तळेकर, प्रकाश पारकर, कलाकार मानधन समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे,सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर, माजी सरपंचर संतोष पारकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर,सोसायटी चेअरमन दिपक सावंत,संचालक श्रीपत पाताडे, उद्योजक प्रविण पोकळे, प्रणिल शेटये, ग्रा.पं.सदस्य बाळा जोशी, अभीजित धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिर्लोटकर,माजी तंटामुक्त अध्यक्ष पपी पाताडे याच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.आम. राणे म्हणाले की, कासार्डे गाव नेहमीच माझ्या पाठीशी राहीला आहे. आजवर अनेक विकास कामे होत असताना गावाला निधी कधीच कमी पडू देणार नाही.आज ब्रीज खालील भागात आपण केलेल्या सुशोभिकरण पाहता हायवे प्राधिकरणाने अशा प्रकारे कामांना परवानगी दिल्यास ब्रीज खालील भागाचे विद्रुपीकरण होणार नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी संजय देसाई यांनी मंडळाच्या कामाची माहीती देत मनोगत व्यक्त केले.आम. नितेश राणेसह संतोष कानडे,बाळा जठार,दिलीप तळेकर,रविराज मोरजकर,पंढरी वायंगणकर, सहदेव खाडये, नितीन लाड याचे विशेष सत्कार व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कासार्डेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे येत्या काही दिवसांत उघ्दाटन : आम. राणे.यांचे सुतोवाच्य. कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारत पूर्ण झाली असेल तर याबाबत आपण जिल्हा आरोग्य अधिकां-याशी चर्चा करुन याबाबत आढावा घेऊन शक्य असल्यात पुढील काही दिवसांत आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे उघ्दाटन करु असे सांगितले. “कासार्डे गावातील रस्ते खनिकर्म विभागातून काँक्रीटीकरण करणार असेही आम. राणे म्हणाले. “कासार्डे गावातल रस्ते खडडेमय झाले आहेत. मात्र जिल्हात खनिकर्म विभागाचा 32 कोटी निधी आहे.यातील 16 कोटी निधी कणकवली मतदारसंघाला असल्याने आपण गावातील रस्त्याची माहीती मला द्या याबाबत जिल्हाधिका-याशी चर्चा करुन कासार्डे गावातील रस्ते खनिकर्म निधीतून काँक्रीटीकरण करु.कासार्डे येथिल रूग्णवाहीकेचे लोकार्पण करताना आम. नितेश राणे सोबत संजय देसाई, संतोष कानडे, प्रकाश पारकर, संतोष पारकर, बाळा जठार, दिलीप तळेकर, निशा नकाशे, आण्णा खाडये आदी उपस्थित.


