शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.18 येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या सह शिक्षिका तथा कवयित्री डॉ.जयश्री विवेक सोन्नेकर यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा ची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.
मराठी विषयातील ‘साठोत्तरी कवींच्या कवितेतील स्त्री दर्शन’ (विशेष संदर्भ-निवडक कवींची कविता एक अभ्यास) याविषयावर त्यांनी प्रबंध विद्यापीठात सादर केला होता. त्यांना या अभ्यासा साठी धाराशिव येथील तेरणा महाविद्यालया तील डॉ. भारत हंडीबाग यांचे मार्गदर्शन लाभले. जयश्री सोन्नेकर यांनी आपल्या जीवनातील अनेक अडचणींवर मात करत हे विशेष यश मिळवले आहे. त्यांची तीन उल्लेखनीय पुस्तके मागील तीन वर्षांत प्रकाशित झाली आहेत. ‘नीरज’ (चरीत्र) ‘व्यथिता’ (कथासंग्रह), ‘भाऊबीज’ (कवितासंग्रह) या सर्व लिखाणाला अनेक मान्यवरांची प्रस्तावना व शुभेच्छा लाभल्या आहेत. तसेच जयश्री सोन्नेकर यांना सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे.दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी, माजी उपाध्यक्ष ऍड. एल. एम. सुभेदार, संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी, सचिव महेशराव खारकर, सहसचिव अभय सुभेदार, जयंत दिग्रसकर, अॅड. किशोर जवळेकर, ललित बिनायके, प्रवीण माणकेश्वर, डॉ. प्रवीण जोग, विष्णूपंत शेरे, रामेश्वर राठी, अशोक चामणीकर, मुख्याध्या पक पी. एस. कौसडी कर, मुख्याध्यापक बी. यु. हळणे आदींसह संस्थेचे सर्व पदाधि कारी, शिक्षक कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.