पुयारदंड येथील घटना.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चिमूर (२० जुलै)- भिसी पासुन अगदी तिनं – चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पुयारदंड येथील युवकांनी जखमी माकडाला जिवदान दिले. सोमवार च्या रात्रो पुयारदंड या गावी वडाच्या झाडाखाली विजेच्या धक्क्याने माकड जखमी झाला. त्याला उठता व चालता येईना.मुक्या प्राण्याची आर्त हाक युवकांनी ऐकली आणि तात्काळ वनविभागाला कळविले.वनविभागाची चमु पुयारदंडमध्ये दाखल झाली.माकडाला भिसी वनविभागात नेऊन पशुसंवर्धन विभागाकडून उपचार करण्यात आले.यावेळी अतुल गावंडे , प्रफुल्ल राजुरकर ,हर्षल वटाणे , अजय गावंडे, सचिन घोडमारे ,सोहम गवळी , राहुल फलके,सौरभ फलके,गौरव निब्रड आदी युवकांनी जखमी माकडाला वाचविण्यासाठी मदत केली.त्यांच्या मदतीमुळे तिकडे कौतुक होत आहे.











